आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर संपन्न

आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न

सोनके ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- सांगोला तालुक्याचे नूतन आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त दि.०५/०१/२०२५ रोजी सोनके ता.पंढरपूर येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर पार पडले.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. निकिताताई देशमुख यांच्या हस्ते पार पडले.या आरोग्य शिबिरासाठी पंढरपूरातील तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरामध्ये डॉ.श्रीकांत देवकते ,डॉ.जया पाटील, डॉ.महेश कोडलकर, डॉ.सेजल देशमुख, डॉ.सुलोचना कोडलकर, डॉ.ओजस देवकते,डॉ.सुरज गायकवाड,डॉ. चारुदत्त शितोळे, डॉ.निखिल कोडलकर, डॉ.रेश्मा करंडे,डॉ. संजय मोरे, डॉ.प्रकाश लवटे, डॉ.चंद्रकांत लवटे, डॉ. किशोर खोंड, डॉ.ओंकार माने यांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर उपचार केले.या आरोग्य शिबिरामध्ये 225 रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

या आरोग्य शिबिरासाठी सहकार शिरोमणी चे व्हॉ.चेअरमन भारत कोळेकर,माजी जि.प. सदस्य तानाजी वाघमोडे,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब हाके, तिसंगी गावचे माजी सरपंच हेमंतकुमार पाटील,सोनके चे माजी सरपंच मल्हारी खरात माजी सरपंच दत्ता खरात,माजी सरपंच दशरथ थोरात,हरिदास थोरात,पाटील सर, सोनके गावचे विद्यमान उपसरपंच युवा उद्योजक बाबासाहेब हाके, कांतीलाल खरात, संतोष पाटील,माजी सैनिक अशोक मदने, रत्नाकर शेळके, दत्ता बंडगर आदी उपस्थित होते.

आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी युवा नेते कशिलिंग शिंदे, धोंडीबा शेळके,सत्यवान खरात,सतिश काळे,भिवाजी खरात, सुभाष कोळेकर,योगेश खरात,प्रमोद पाटील,माऊली लेंगरे, सुनिल कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला,आरोग्य सेविका आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. हरिदास गलांडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top