ड्रेनेज ‘ओव्हरफ्लो’; नागरिकांना दुर्गंधीचा त्रास…आंबेडकर नगरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगरमधील नागरिकांना घरासमोर ड्रेनेज तुंबून मैला मिश्रित पाणी परिसरात वाहून दुर्गंधी सुटणे नित्याचेच झाले. नागरिक मैला मिश्रित पाण्याच्या दुर्गंधीने हैराण झालेत. लहान मुले,वयोवृद्धांचे आरोग्य धोक्यात आहे.नागरिकांना आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

नगरातील ड्रेनेज लाईन नव्याने टाकण्यात यावी आणि नागरिकांना होणाऱ्या या नाहक त्रासातून मुक्तता मिळावी अशा आशयाचे निवेदन बहुजन हितकारिणी सभेकडून मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी रवी सर्वगोड,सतीश सर्वगोड,उमेश आगावणे,इम्रान तांबोळी, सुरज साखरे, स्वप्नील कांबळे, सिध्दनाथ सावंत, पप्पू कांबळे आदी उपस्थित होते.
