उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि०३/०२/२०२५- आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील,आमदार समाधान आवताडे, आमदार नारायण पाटील,खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार उपस्थित होते.

यावेळी विविध विषयांच्या संदर्भातील निवेदन आमदार अभिजीत पाटील यांनी दिली ती याप्रमाणे –
१.उद्यापासून कॅनॉलला पाणी सोडावे यासाठी मागणी केली.
२.तुळशी,बावी,परितेवाडी आणि अंजनगाव (खे) यागावात पाण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व नवीन सुधारित सुप्रमा व सुधारित DSR नुसार मान्यता देण्यात यावी.
३.सिना-माढा उपसा सिंचन योजना मोटार व पाईपलाईन ही गेली ३०वर्ष जुनी झाली असून सातत्याने दुरुस्ती करावी लागते त्यामुळे नवीन मोटर्स व नवीन पाईपलाईन सुमारे ६.५ किलोमीटर रायझर लाईन करणे.
४.सिना-माढा उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू करणे.
५.भीमा नदीवरती दहा मीटर उंचीचे बॅरीगेट उभा करणे.
६.मानेगाव उपसा सिंचन योजनेस अंतिम निर्णय देणे.
यावर सकारात्मक कार्यवाही होईल असा विश्वास वाटतो अशी प्रतिक्रिया माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.
