केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्या प्रकरणी भीम आर्मीतर्फे तीव्र निषेध आंदोलन
अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा -प्रमोद कातकर जिल्हा उपाध्यक्ष,भीम आर्मी चंद्रपूर
चंद्रपूर कोठारी,दि २०/१२/२०२४ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्याद्वारे लिखित भारतीय संविधान हे केवळ एका विशिष्ट जातीधर्मासाठी नसून ते या देशातील सर्व भारतीयांसाठी आहे.बाबासाहेबांच्या लिखित भारतीय संविधानामुळेच हा देश एकसंघ आहे.सर्व जातीजमातीचे धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत असे असताना देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बी.आर. आंबेडकरांबद्दल संसदेत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी भीम आर्मी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रायपूरे यांच्या आदेशान्वये जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कातकर यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालय कोठारी (संविधान चौक) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्य संसदेत विशेष चर्चेदरम्यान अमित शहा यांनी आंबेडकर,आंबेडकर, आंबेडकर,आंबेडकर, बोलना अभी एक फॅशन हो गया है.इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मो तक स्वर्ग मिल जाता असे बेताल वक्त्यव्य राज्यसभेतील भाषणात केले.याचाच उद्रेक होऊन संसदेपासून तमाम आंबेडकरप्रेमी यांनी रस्त्यांवर येऊन निषेध नोंदविला आणि अमित शहा यांना त्यांच्या मंत्रिमंडळातून बर्खास्त करून राजीनामा द्यावा व संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.

आजच्या तीव्र निषेध आंदोलनात कोठारी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच अमोल कातकर,जामा मस्जिद मुस्लिम कमेटी सचिव रियाज शेख,काँग्रेस चे युवा नेते अखिल गेडाम, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष लखन उराडे,भीम आर्मी शाखा कोठारी चे कार्याध्यक्ष युगल तोडे,कार्यकर्ते पंकज जावलीकर,विनोद कुळसंगे,निखिल मावलीकर,अमित चंदावार,सागर मुरमाळकर,आकाश कांबळे,प्रफुल साखरकर, शुभम खोब्रागडे,अजय खोब्रागडे, आशिष पाटील, राहुल देठे, नितीन बोरकर, सुरज खोब्रागडे,राहुल वासंमवार,जेष्ठ कार्यकर्ते बाळू खोब्रागडे, रवी गोंधळी, मधुकर शेरकर, मनोरमा रंगारी तसेच सर्व जातीधर्मातील नागरिकांसह भीमसैनिक सहभागी होते.