महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

कोल्हापूर/ जिमाका,दि.१३/१२/२०२४ : माहे डिसेंबरचा महिला लोकशाही दिन सोमवार दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस.वाईंगडे यांनी दिली आली आहे.

महिला लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करुन घ्याव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक तक्रारींचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top