नाना पटोले यांनी परभणी हिंसाचारावरून महायुती सरकारवर निशाणा साधला


Nana Patole
Nana Patole News: महाराष्ट्रातील परभणीच्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करून संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 

 

पोलिसांनी अत्याचार थांबवावेत, असे देखील ते म्हणाले. संविधानाचा अवमान करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा आदर करणाऱ्या लाखो जनतेचा घोर अपमान आहे असे देखील ते म्हणाले. तसेच परभणी जळत असताना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मंत्रिपदाची विभागणी करण्यात व्यस्त होते. संविधानाचा आदर न करणारे लोक सत्तेत आहे, त्यामुळे अशा घटना घडत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी डॉ.आंबेडकर समर्थकांवर अमानुष हिंसाचार केल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By- Dhanashri Naik



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top