राजस्थानची औद्योगीक क्रांतीकडे वाटचाल होत आहे -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रायजिंग राजस्थान इंवेस्टमेंट समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती

जयपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.9 –प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत देश विकसित राष्ट्र होत आहे.या विकासयात्रेत भारत संघ राज्याचा अविभाज्य घटक म्हणून राजस्थानही आपले योगदान देत आहे. राजस्थान चे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी रायजींग राजस्थान ग्लोबल इंवेस्टमेंट समिट चे केलेले आयोजन हे राजस्थानच्या औद्योगिक प्रगतीतील मैलाचा दगड ठरेल. राजस्थान पर्यटन क्षेत्रासोबत ऊर्जा क्षेत्रात भविष्यात मोठी झेप घेऊ शकतो. राजस्थानची वाटचाल औद्योगिक क्रांतीकडे होत आहे.त्यासाठी मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार राजस्थान च्या पाठीशी उभे आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
आज जयपूर मध्ये आयोजित रायजींग राजस्थान ग्लोबल इंवेस्टमेंट समिट चे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.त्या कार्यक्रमास राजस्थान चे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी खास आवर्जून ना. रामदास आठवले यांना विशेष अतिथी म्हणून या सोहळ्यास निमंत्रित केले होते. त्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले असता प्रसिद्धिमाध्यामांशी ना.रामदास आठवले यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी,आनंद महिंद्रा आणि देश विदेशातील अनेक यशस्वी उद्योजक या परिषदेस उपस्थित होते.
रायजिंग राजस्थान ग्लोबल इंवेस्टमेंट समिट मुळे राजस्थान मध्ये मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होणार आहे.राजस्थानात येणाऱ्या उद्योगांमुळे राजस्थान ची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होणार आहे.या स्तुत्य उपक्रमाबद्दल ना.रामदास आठवले यांनी राजस्थान चे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे अभिनंदन केले.
