उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भाजप ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना भावपूर्ण आदरांजली

भाजप ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली

मुंबई /डॉ अंकिता शहा : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या दु:खद घटनेनंतर शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करत भावपूर्ण आदरांजली वाहिली.

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले असून सर्व आदिवासी समाजासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या जाण्याने राज्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्राने एक उमदे नेतृत्व गमावले आहे.

ईश्र्वर मधुकरराव पिचड यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो,अशी प्रार्थना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top