आरसेटी प्रशिक्षणातून उत्तम रोजगारक्षम व्यक्ती घडावेत-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
परभणी,दि.०७/१२/२०२४,जिमाका-दि.०६ डिसेंबर रोजी एसबीआय आरसेटी परभणी येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट दिली व आरसेटी कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.आरसेटीमध्ये सुरु असलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणास त्यांनी भेट दिली.

त्यांनी प्रशिक्षणातून उत्तम रोजगारक्षम माणसे घडवीत,अशी अपेक्षा व्यक्त केली.या वेळी संस्थेचे काही यशश्वी उद्योजक देखील उपस्थित होते.त्यांचा जिल्हाधिकार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमासाठी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उदय कुलकर्णी यांची उपस्थिती होती.संस्था संचालक जितेंद्रसिंह कुशवाह यांनी संस्थेच्यावतीने पुष्पगुछ देऊन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा सत्कार केला.कार्यक्रमास जिल्हा अग्रणी कार्यालयाचे योगेश गुंडाळे, आरसेटी स्टाफ मनीषा कदम,मंगेश कोमटवार,संभाजी हनवते,संगीता आवचार,सुरेश उबाळे आदी उपस्थित होते.
