LIVE: शनिवार 7 डिसेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी


Maharashtra News update

Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या असून देवेंद्र फडणवीस आता राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहे. तसेच 7 डिसेंबर आजपासून महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत होणार आहे, ज्यामध्ये नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील आणि विधानसभा अध्यक्षांची निवड करतील. ही तीन दिवसीय परिषद असणार आहे. यामध्ये प्रोटेम स्पीकर कालिदास कोळंबकर निवडणुकीनंतर निवडून आलेल्या 288 उमेदवारांना शपथ देतील. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
ईडीने महाराष्ट्रातील दोन शहरांमध्ये मोठी कारवाई केली असून त्यात कोट्यवधींची रक्कम जप्त केली आहे. ईडी ने शुक्रवारी अहमदाबाद आणि मुंबईतील सात ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि या ठिकाणांहून 13.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. सविस्तर वाचा 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांना आयकरातून सूट देण्यात आली आहे. दिल्लीचे बेनामी ट्रिब्यूनल न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. <a href="https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/ajit-pawars-confiscated-properties-exempted-from-income-tax-124120700004_1.html"><strong>सविस्तर वाचा </strong></a></p>

 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या असून देवेंद्र फडणवीस आता राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित सभागृहाच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ घेतली. सविस्तर वाचा

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन तब्बल 13 दिवसांनी, महाराष्ट्रातील महायुती सरकारचा बहुप्रतिक्षित शपथविधी सोहळा गुरुवारी संपन्न झाला. यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. सविस्तर वाचा 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top