पुण्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या


murder knief
Pune News: महाराष्ट्रातील पुणे शहरातील घोरपडी-वानवडी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वानवडीतील रामटेकडी येथे मंगळवारी  एका अल्पवयीन मुलाची भरदिवसा हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.   

 

तसेच अल्पवयीन मुलांमध्ये काही कारणावरून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर अचानक दोघांनी एका 17 वर्षीय मुलावर धारदार चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश सुनील घाटे17 असे मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी यश हा कॉलेजला जाण्यासाठी घरून निघाला असताना वाटेत दोन मुलांनी त्याला अडवून धारदार चाकूने वार करून यशची हत्या करण्यात आली. भरदिवसा झालेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात यशचा भाऊ प्रज्वल सुनील घाटे याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 18 वर्षीय साहिल लतीफ शेख आणि ताहिर खलील पठाण यांना अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हत्या करून साहिल आणि ताहिर फरार झाले होते. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. याप्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहे. 

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top