पोटनिवडणुकीतील पराभवापेक्षा मोठ्या मताधिक्याने भालकेंचा पराभव
भगिरथ भालकेंची हवा असतानाही त्यांचा झालेला पराभव विचार करायला लावणारा
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलायात महायुतीने अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर यश मिळवले. महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना उबाठा ने प्रत्येकी कमीत कमी पन्नास जागा जिंकून आम्ही सत्ता स्थापन करु असे जाहीर केले होते.मात्र यात त्यांना अपयश आले आणि ते एकत्रीत कसेबसे साठ पर्यंत पोहोचले.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात काहीशी अशीच परिस्थिती राहीली.भाजपा चे समाधान आवताडे,काँग्रेसचे भगिरथ भालके,राष्ट्रवादी शपचे चेअनिल सावंत, मनसेचे दिलीप धोत्रे यांच्यामध्ये ही निवडणूक झाली.यामध्ये समाधान आवताडे यांनी दुसर्यांदा व पहिल्या पेक्षा जास्त मताधिक्याने विजय प्राप्त केल्याचे दिसत आहे.पोटनिवडणुकीतील विजयानंतर गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत समाधान आवताडे यांनी मतदार संघात केलेल्या कामांच्या जोरावर निवडणूक लढवली.
याउलट भगिरथ भालके यांचे झाले.पंढरपूर तालुक्यातील कासेगाव जिल्हा परिषद गटातुन भगिरथ भालके यांनी निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भगिरथ भालके यांचा पराभव झाला त्यानंतर काही दिवसात ज्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन होते त्या कारखान्याच्या निवडणूकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.आता ते पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीच्या रिंगणात उतरले परंतु योग्य सहकारी आणि यंत्रणेअभावी तसेच त्यांच्या नॉटरिचेबल प्रतिमेमुळे त्यांना पोटनिवडणुकीतील पराभवापेक्षा जास्त मताधिक्याने आता पराभव झाला.आता त्यांनी जनतेच्या सतत संपर्कात राहणे गरजेचे आहे.वास्तविक भगिरथ भालके यांचीच हवा होती मात्र त्याचे रुपांतर मतदानात झाले नाही.