मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलीप धोत्रे यांना विजय करण्याचा निर्धार
मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या दिलीप धोत्रे यांना मतदारांची साथ
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारसभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गावागावात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे.आज रविवारी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील सलगर खु,सोद्दी,शिवनगी,येळगी,डिकसळ,कागशत,कात्राळ, बालाजी नगर या गावांमध्ये मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आल्या.

यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाली की, मतदार संघात कोणतीही विकास कामे झाली नाहीत. तीन हजार कोटीची विकास कामे झाल्याचा दावा करणार्या आमदारांनी केवळ कागदावरच विकास कामे केली आहेत. यामुळे येथील जनता समस्याने त्रस्त झाली आहे.मतदार संघात मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. अनेक युवक बेरोजगार झाले आहेत.त्यांना नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागत आहे.मंगळवेढा तालुक्यात पाण्यावरच राजकारण केले जाते. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना पाणी मिळत नाही. मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येथील जनता राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून मला निवडून देतील असा विश्वास दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला.

दिलीप धोत्रे यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणामध्ये मोठे योगदान दिले आहे.मतदार संघातील नागरिकांना देवदेवतांचे दर्शन घडावे यासाठी विविध यात्रांचे आयोजन करून हिंदू बांधवांना देव देवतांचे दर्शन घडवले होते.यानंतर त्यांनी मुस्लिम बांधवांसाठी अजमेर यात्रा आणि बौद्ध बांधवांसाठी नागपूर दीक्षाभूमी यात्रेचे आयोजन करून दर्शन घडवले होते.याचा फायदा आगामी निवडणुकीत नक्कीच त्यांना होईल असे सांगितले जात आहे.
