पंढरपूर येथे पिनॅकल च्यावतीने शेअर मार्केट गुंतवणूक जागृती सेमिनार संपन्न
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – दि 20 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल चतुर्थी येथे पिनॅकल फॉरेक्स अँन्ड सिक्युरिटीज प्रा ली चे डायरेक्टर अरविंद विंच्छीवोरा यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी यासंबंधी मार्गदर्शन केले.
बीएसई चे प्रतिनिधी तुषार प्रभू यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करताना योग्य सल्ला व मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करावी असे आवाहन केले.

पिनॅकलचे प्रतिनिधी जयांक ठक्कर यांनी गुंतवणूकदारांचे प्रश्न व शंका विचारून गुंतवणूक ही काळाची गरज आहे, त्याच प्रमाणे आर्थिक साक्षरता किती महत्त्वाची आहे याचे महत्व सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर मधील पिनॅकलचे सब ब्रोकर प्रतापसिंह देवकर यांनी केले.सेमिनारसाठी पंढरपूर व परिसरातील गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग बिराजदार,गणेश उलभगत, संदीप जगताप आदींनी विशेष प्रयत्न केले.
