भाजप नेत्याच्या घरावर बॉम्ब फेकले, नेते किरकोळ जखमी



पश्चिम बंगालचे भाजपचे नेते अर्जुन सिंह यांच्या घरावर अज्ञातांनी क्रूड बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला.या हल्ल्यात भाजपचे नेते अर्जुन सिंह किरकोळ जखमी झाले आहे. 

या हल्ल्यावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, माझ्यावर हल्ला करणे हे सुनियोजित कट आहे. या मध्ये पोलिसांचा देखील सहभाग असण्याची शक्यता आहे. तर काहींनी हल्लेखोरांचा सामना केला.

भाजपचे नेते अर्जुन सिंह यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोऱ्यानी बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला.

ते म्हणाले, राज्यातून टीएमसी हे नष्ट होत असून ते आता राज्यात भीती पसरवत आहे. या हल्ल्यात स्थानिक नगरसेवकाच्या मुलासह 10-15 जिहादी सामील आहेत.

हल्ल्यांनंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली त्यात त्यांनी लिहिले, आज सकाळी घरात सर्वजण नवरात्रीच्या पूजेत व्यस्त असताना स्थनिक पोलिसांच्या संरक्षण आणि देखरेखी खाली अनेक गुंड्यानी माझ्या कार्यलयासह मजदूर भवनावर हल्ला केला आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका केली. ते मूक होते. हल्लेखोर पोलिसांसमोर शस्त्र  उगारत होते 15 बॉम्ब फेकले आणि डझन हुन अधिक राउंड फायर केले. बंगाल पोलीस हे राज्य सरकारचे बाहुले बनले आहे. हे सर्व लज्जास्पद आहे. 

Edited by – Priya Dixit  

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top