पंढरपूरातून हजारो मुस्लिम बांधवांना घेऊन मनसेची दर्शन यात्रा अजमेरकडे रवाना
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिल्या मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून अजमेर येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक भारतातील मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधी स्थळ दर्गा आहे. या समाधी स्थळाचे दर्शन मुस्लिम बांधवांना घडावे या हेतूने मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या दर्शन यात्रेसाठी पंढरपूर-मंगळवेढ्यातील हजारो मुस्लिम बांधव अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथून शुक्रवारी सकाळी अजमेरकडे रवाना झाले आहेत.या दर्शन यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील मुर्शिदबाबा दर्गा येथे पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी दिलीप धोत्रे यांच्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवेढ्यातील मुस्लिम बांधवांसाठी २० हून अधिक लक्झरी बसेसची सुविधा सोय केली आहे.
चार दिवस चालणाऱ्या या दर्शन यात्रेसाठी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या मुक्कामाची नाष्टा व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे.