स्वप्न सुरांचे तरुणाईचे बहारदार गाण्यांची मैफल मंगेश बोरगांवकर यांनी आणली रंगत
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित गणेशोत्सव संगीत महोत्सव
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व मंदिरे समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या अथक परिश्रमातून प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्री संत तुकाराम भवन येथे श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवात दुसरे पुष्प महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक मंगेश बोरगांवकर यांनी गुंफले.
सुरुवातीला सदस्य श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, प्रशांत वांगीकर , मंगेश बोरगावकर यांच्या हस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

सुरुवातीला दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठूरायाचा जय जय राम कृष्ण हरी गजराने आणि येई ओ विठ्ठले भक्तजण वत्सले अभंगाने होत वातावरणात भक्तीमय करत पुढे भावगीतांची बहारदार गाण्यांची मैफल त्यामध्ये बगळ्यांची माळ फुले,मन उधान वाऱ्याचे,स्वरगंगेच्या काठावरती,तू सप्तसूर माझे,डौल मोराच्या,राधा ही बावरी,शुर आम्ही सरदार..अलबेला सजन आओ,दिपाडी डिपांग,जो वादा किया वो निभाना पडेगा,रिमझिम गिरे सावन आदी एक से बढकर एक गाणी गाऊन पंढरपूरकर कलारसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना साथसंगत निवेदन पूजा थिगळे,सोहम साने साईड रिदम,गिटार महेश बधे,बासगिटार चंद्रकांत उनवणे,कीबोर्ड ओंकार उजगरे,ऑक्टोपॅड अनिकेत शहारे,पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केली.सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले.
यावेळी पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कला रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी ,अधिकारी आणि कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
पुढील चार दिवस ख्यातनाम कलाकारांचे गायन ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे वतीने करण्यात आले आहे.