अवधूत गांधी यांचे सुश्राव्य लोकसंगीत कार्यक्रमाने मंदिर समिती गणेशोत्सव संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात

अवधूत गांधी यांचे सुश्राव्य लोकसंगीत कार्यक्रमाने गणेशोत्सव संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने आयोजित पंढरपूरकरांना मिळतेय सांस्कृतिक मेजवानी

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव संगीत महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली.

प्रथम मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, गायक अवधूत गांधी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.वारकरी सांप्रदायाचा बीज मंत्र जय जय राम कृष्ण हरी या ने सर्व वातावरण भक्तीमय होत होते.रुपाचा अभंग,ध्यानाचा अभंग,ज्ञानियांचा राजा गुरु महाराव,काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती,चित्रपट गीत हेचि येळा यानंतर आईचा गोंधळ,गणरायाचे स्तवन, गवळणी गाई गोपाळ यमुनेच्या तटी, नका मागे घेऊ,शिवबा राज,युगत मांडली अशी अनेक सुंदर विविध लोकसंगीत,भक्ती गीते,शिवाजी महाराजांची पोवाडे,स्फूर्ती गीते सादर करून उत्साही वातावरण पहिल्याच दिवशी निर्माण होऊन शेवटी हेचि दान देगा देवा भैरवी गात कार्यक्रमाची सांगता केली.

त्यांना तितकीच सुंदर साथ तबला पांडुरंग पवार, हार्मोनियम अभय नलगे ,पखवाज राजेंद्र बघे,टाळ प्रसाद भांडवलकर , स्वर साथ विजय सोनवणे ,संबळ सोमनाथ तरटे,दिमडी सुरज तरटे यांनी दिली.

सुत्रसंचलन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूरकर रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.तीन दिवस गौरी आगमनामुळे तीन दिवस कार्यक्रम नसले तरी पुढील १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर पर्यंत भरगच्च कार्यक्रम आहेत त्याही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने करण्यात आले आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व‌ पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top