क्षुल्लक कारणांवरून शालेय विद्यार्थिनीची मारहाण, वर्सोवाचा व्हिडीओ व्हायरल


women fight
मुंबईतील वर्सोवातुन एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही  क्षुल्लक कारणांवरून झालेल्या वादानंतर काही अल्पवयीन मुलींच्या गटाने एका शाळकरी मुलीला मारहाण केली. 

ही घटना वर्सोवाच्या यारी रोड परिसरातील दोन आठवड्यांपूर्वीची आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हायरल व्हिडीओ मध्ये एका शाळकरी मुलीला काही मुलींच्या टोळक्याकडून मारहाण केली जात आहे. मुलीला लाथाबुक्क्याने तुडवत आहे. पीडित विद्यार्थिनी जमिनीवर पडली आहे.

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यावर पोलिसांनी त्यात दखल घेतली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुली आणि हल्लेखोर मुलींच्या पालकांना बोलावूंन दोन दिवस समुपदेशन केले.हा व्हिडीओ कोणी बनवला आणि व्हायरल केला पोलीस तपास करत आहे.  

या प्रकरणातील पीडित मुली आणि मारहाण करणाऱ्या सर्व मुलींच्या पालकांना बोलावून वर्सोवा पोलीस अधिकारी आणि स्नेहा फाउंडेशन स्वयंसेवी संस्थाने स्थानिक बालकल्याण समिती सदस्यांच्या मदतीने दोन दिवस समुपदेशन केले. तसेच निर्भया पथक या प्रकरणावर लक्ष ठेवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Edited by – Priya Dixit   



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top