दारूसाठी पंधरा वर्षे पूर्ण
पंढरपूर ,अमोल कुलकर्णी – शीर्षक वाचून बऱ्याच जणांना धक्का बसला असेल पण होय ही बाब सत्य आहे. दारू ह्या एकाच विषयासाठी सलग पंधरा वर्षे धडपड चालू आहे अल्कोहोलिक अनोनमस या संस्थेची. अनेकांचे संसार दारुमुळे उध्वस्त झाले अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. अनेक कल्पना,अविष्कार, शोध दारूमुळेच लागले हेही सत्य आहे.दारू पिणं हे वाईट नसून दारूची सवय जडणे त्यातून आर्थिक नुकसान होणे,कौटुंबिक सामाजिक स्तर खालावणे आणि व्यक्तीचे जीवन संपणे यासाठी हा संघर्ष सुरू आहे. काहीतरी वेगळं करावं अशा आशयाच्या जाहिरातीने शीतपेय पिण्याची सुरुवात होते आणि ती घेतल्याशिवाय मी जगू शकत नाही इथपर्यंत येऊन पोहोचते.नशा आणि समस्या यातून व्यक्ती आपला संयम गमावून बसतो आणि हेच टाळण्यासाठी पंढरपुरातील जवळपास साठ मित्र दारूवर नियंत्रण मिळवण्यासाठी झटत आहेत.
आंतरराष्ट्रीय संस्था असणाऱ्या संघटनेचे कार्यालय पंढरपुरातील जुन्या सरकारी दवाखान्यांमध्ये केवळ दहा बाय सहा चौरस मीटर जागेत गेली पंधरा वर्षे सुरू आहे.दारू पासून पासून मुक्ती कशी मिळवावी यावर मार्गदर्शन केलं जातं.आपली स्वतःची अथवा दारू पिणाऱ्या व्यक्तीची ओळख न दाखवता दारूपासून लांब कसे राहता येईल याचे सर्व उपाय आणि प्रेरणा देण्याचं काम या संस्थेमार्फत चालवलं जातं.या संस्थेने आत्तापर्यंत ग्रामीण भागातील विविध शिबिरातून तसेच वारी कालावधीमध्ये कन्नड,तेलुगु, मराठी भाषेत प्रकाशन पत्रे छापून विविध मार्गदर्शक कट्टे उभा करून लाखो वारकर्यांना देखील दारूपासून परावृत्त केले आहे. स्वयं खर्च, वर्गणी,देणगी यातून अशाप्रकारे जगातील 26 देशांमधून हा उपक्रम चालवला जातो.
पंढरपुरातील शाखेद्वारे आठवड्यातील चार दिवस श्रद्धा समूह (रविवार) ,नवजीवन समूह विद्या विकास प्रशाला लक्ष्मी टाकळी (मंगळवार), प्रसन्नता समूह जि प शाळा इसबावी (बुधवार) तर चेतना समूह गौतम विद्यालय पंढरपूर (गुरुवारी) आणि जिल्ह्यात मोहोळ येथे नव आशा समूह संभाजी गरड विद्यालय प्रत्येक रविवारी, सांगोला येथे स्नेह समूह जिल्हा परिषद शाळा भोपळे रोड प्रत्येक शनिवारी, अकलूज येथे नवदिशा समूह उपजिल्हा रुग्णालय रविवारी, तर मंगळवेढा येथे नम्रता समूह जवाहरलाल हायस्कूल बुधवार व शनिवार अशी शिबिरे घेतली जातात आणि यातून दारू पिण्याच्या सवयीवर नियंत्रण कसे करता येईल याचे मार्गदर्शन केले जाते.
व्यक्तीच्या पिण्याच्या सवयीनुसार त्याची पद, प्रतिष्ठा,दर्जा ठरवणारी एकमेव दारू या विषयावर दारू पासून दूर कसे जायचे हे दारू पिणाऱ्याच व्यक्तीच्या अनुभवातून काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पंढरपूर शाखेला 28 जुलै रोजी पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. अधिक माहितीसाठी खालील 9767349893,9922089609 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निनावी मद्यपी पंढरपुरातील ए महेश व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.