रावसाहेब वाघमारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –अतिशय खडतर परिस्थितीतून आणि बीएससी भाग दोन मधून एम्प्लॉयमेंटच्या कॉल वरून ०१/१२/ १९९२ रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात भरती झालो.जानेवारी ते जुलै 1993 रोजी पीटीएस अकोला येथे ट्रेनिंग पूर्ण केले.ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे 1995 पर्यंत कार्यरत होतो.
मंद्रूप पोलीस स्टेशन येथे माझे पहिले पोलीस पोस्टींग झाले.मात्र वयोवृद्ध आई वडील आणि एक भाऊ अपंग असल्याने पोलीस दलातील सर्व नोकरी पोलीस मुख्यालय सोलापूर,मंद्रूप पोलीस स्टेशन, वेळापूर पोलीस स्टेशन,अकलूज पोलीस स्टेशन येथेच गावाकडून कुटुंब न हलवता येऊन जाऊन केली.आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या कृपेने मला पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन, पंढरपूर शहर पोलीस स्टेशन आणि आता 2020 पासून, विठ्ठल मंदिर सुरक्षा शाखा पंढरपूर येथे मनापासून सेवा करण्याची संधी मिळाली.

शासकीय नियमानुसार पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस हवालदार,पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस फौजदार अशी बढती मिळाली आणि आता सेवा जेष्ठतेनुसार पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती मिळून माझे दिव्य स्वप्न पूर्ण झालेले आहे आणि मी विठ्ठल मंदिर सुरक्षा शाखा पंढरपूर येथे कार्यरत आहे. या 32 वर्षाच्या प्रवासामध्ये नोकरी आणि कुटुंब याचा ताळमेळ बसवताना खूप मोठा संघर्ष करावा लागला. अतिशय प्रामाणिकपणे आणि चिकाटीने ही नोकरी करत असताना माझी अर्धांगिनी आणि माझी दोन मुलं,एक मुलगी हीच माझी अतिमोलाची संपत्ती मला लाभली.माझ्या यशामागे हे सर्वजण आणि मुख्य म्हणजे माझे आई आणि वडील यांचा फार मोठा आशीर्वाद आणि सिंहाचा वाटा आहे.माझ्या आईने अतिशय खडतर परिस्थितीत मोठे कष्ट करून मला आज या पदावर पोहोचवलेलं आहे.स्नेही मित्र यांचा चांगला सहवास लाभला. ज्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचू शकलो त्याबद्दल सर्वांचे आदरपूर्वक धन्यवाद करतो आभार मानतो असे शब्द आहेत एका प्रामाणिक खडतर परिस्थितीतून पोलीस उपनिरीक्षक या पदावर नुकतीच बढती मिळालेल्या गुरसाळे ता.पंढरपूर या ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या पोलीस अधिकार्याचे नाव रावसाहेब वाघमारे सध्या विठ्ठल मंदिर सुरक्षा शाखा पंढरपूर येथे कार्यरत.त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.