आमदार म्हणून राष्ट्रनायक महादेव जानकर साहेबांचा सभागृहातील आजचा शेवटचा दिवस

आमदार म्हणून राष्ट्रनायक महादेव जानकर साहेबांचा सभागृहातील आजचा शेवटचा दिवस

ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१२/०७/२०२४- राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांनी जानेवारी २०१५ ला पहिल्यांदाच आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये प्रवेश केला. आमदार असताना ३ वर्ष ३ महिने राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून राज्यांमध्ये त्यांनी काम पाहिलं.त्यांना पहिली विधान परिषदेची टर्म ही ३ वर्ष ६ महिन्याची तर दुसरी विधान परिषदेची टर्म ही ६ वर्षाची एकूण ९ वर्ष ६ महिने विधान परिषदेचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार म्हणून काम केल्यानंतर आज सभागृहातील त्यांचा शेवटचा दिवस होता.

आमदार आणि मंत्री झाल्यानंतर अनेक लोक उपयोगी काम करण्याची भूमिका राष्ट्रनायक महादेव जानकर साहेबांनी घेतली. राज्यां मधील झालेली प्रथमच ऐतिहासिक दुधाची दरवाढ त्यामध्ये शासनाच्या वतीने गाईच्या दुधाला प्रती लिटर ५ रुपये अनुदान व पावडर प्रक्रियेसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान देण्याचे काम केले. त्यामुळे दुधाचा दर पुढील पाच वर्ष स्थिर राहिला हा दूरदृष्टीचा निर्णय त्याकाळी घेण्यात आला.

फक्त धनगर समाजासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सहित धनगर समाजाला आदिवासींच्या १३ योजना लागू करण्याचा निर्णय दहा हजार कोटीची घोषणा, बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेला कोर्टाला पॉझिटिव्ह अहवाल,आदर्श चारा छावणी ऑनलाइन पद्धतीने,शेळ्या-मेंढ्यांची देशातील पहिली चारा छावणी सुरू करण्याचा निर्णय,पशुसंवर्धन सारखे दुर्लक्षित खाते देशात एक नंबरला घेऊन जात असताना ७०० कोटी बजेट असणारे १२ हजार कोटी वर नेहून ठेवण्याचे काम केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

१ रुपयात जनावरांचा विमा, पशु गणना, शेतकऱ्यांच्या बांधावर जनावरांसाठी फिरता दवाखाना गाडीचा निर्णय,पश्चिम महाराष्ट्रा तील दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी कॅबिनेटमध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार,सारथीच्या धरतीवर ओबीसींसाठी महाज्योती स्थापना करण्यासाठी पुढाकार, शेतकऱ्याचा मुलगा उद्योजक व्हावा यासाठी मत्स्य विभागा मार्फत केज कल्चर योजना निर्माण करण्याचा निर्णय, सोलापूर विद्यापीठाचे नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असे करण्याचा निर्णय असो अथवा वारकरी आणि ट्रॅफिकचा विचार करून कधी नाही ते आषाढी वारीला सारेच मंत्री एका बसमधून मुख्यमंत्र्यासहित नेण्याचे काम असे अनेक निर्णय जे करता येईल ते करण्याचं काम आपल्या या कार्यकाळात करत असताना आज विधान परिषदेचा कार्यकाळ त्यांचा समाप्त झाला.

माझ्या ज्ञात असणाऱ्या ठराविक गोष्टी मांडण्याचा मी प्रयत्न केला असून माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आशा आहे की, राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब आता दिल्लीमध्ये खासदार म्हणून संसदेत दिसावेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून हार्दिक हार्दिक रासपमय शुभेच्छा..!

अजित पाटील,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष – राष्ट्रीय समाज पक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top