मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज मोफत भरणेच्या शिबिरासाठी अभिजीत पाटील यांचा देवडे गावांतील महिलांना मदतीचा हात

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज मोफत भरणेच्या शिबिराचे आयोजन चेअरमन अभिजीत पाटील यांचा मौजे देवडे गावांतील महिलांना मदतीचा हात

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून पंढरपूर तालुक्यातील मौजे देवडे गावांतील लाभार्थी महिलांना ग्रामपंचायत कार्यालय, देवडे येथे शुक्रवार दि.०५.०७.२०२४ रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज मोफत भरून देण्यात आले.

सदरचे अर्ज हे ऑफलाईन भरून घेऊन नंतर ऑनलाईन करीत आहोत. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ घेणेसाठी काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांची होणारी धावाधाव लक्षात घेऊन भावी आमदार अभिजीत धनंजय पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील मौजे देवडे येथे घेतलेल्या या शिबिराप्रमाणेच संपुर्ण तालुक्यामध्ये सदर योजनेची शिबीरे घेण्याचा त्यांचा मानस आहे.

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, या योजनेचे अर्ज पंढरपूर तालुक्यातील देवडे गावातून सर्वात जास्त भरलेले असून देवडे गांव हे प्रथम क्रमांकावर आहे. चेअरमन अभिजीत आबांच्या या स्तुत्य उपक्रमाला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजन या योजनेचे शिबीर यशस्वी होणेसाठी देवडे गांवचे सरपंच श्री सोमनाथ झांबरे सर मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top