नितीन काळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- समाजसेवक नितीन काळे यांना पुणे येथील टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काळे हे अनेक वर्षांपासून समाजसेवेचे काम करीत आहे.
प्रत्येकाच्या अडचणीला व मदतीला धावुन जाणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून काळे यांची सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे. काळे यांचा जनसंपर्क देखील मोठ्या प्रमाणात असुन गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असो अथवा शासकीय कार्यालयातील कामे असो सामान्य जनतेची कामे मार्गी लावतात. जीवनात अनेक अडचणींवर मात करत कठोर परिश्रम करत राहायचे .सामान्य माणसाला कायम मदतीची भुमिका घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करत त्यांना न्याय मिळवून देईल असे नितीन काळे यांनी बोलताना सांगितले.
या कार्याची दखल घेत त्यांना तब्बल 25 पुरस्काराने अनेक संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.नितीन काळे यांना कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तुत्वावर त्यांनी राजकीय सामाजिक क्षेत्रातही मोठे नाव केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. संघटन कौशल्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षाने अनेक वेगवेगळ्या पदांवर राज्यात काम करण्याची संधी दिली आहे .सध्या ते युवा मोर्चा प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.ते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
त्यांना टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने इंडियन टॅलेंट नॅशनल अवॉर्ड 2024 समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ दिपक जाधव यांनी सांगितले.हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुणे येथे पंढरपुरहुन उद्योजक राजाभाऊ खोबरे, शिवाजी घाडगे, नागेश बुधवंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.