केंद्रीय राज्यमंत्रीपदाची हॅट्रीक केल्याबद्दल रामदास आठवले यांचा नवी दिल्लीत सत्कार
मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.1 –रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भारत सरकारमध्ये तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण देशातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये आणि दलित बहुजन जनतेमध्ये आनंद व उत्साह आहे.केंद्रिय राज्यमंत्रीपदाची हॅट्रीक केल्याबद्दल ना.रामदास आठवले यांचा नवी दिल्लीतील कन्स्टिटयूशन क्लब स्पीकर हॉल येथे येथे देशभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यंच्या वतीने उद्या मंगळवार दि.2 जुलै रोजी दुपारी 3 वाजता भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची उद्या नवी दिल्लीत बैठक
रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक उद्या मंगळवार दि.2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर नवी दिली येथे आयोजित करण्यात आली आहे. देशातील सामाजिक न्याय मंत्रालयाच्या योजनांचा आढावा आणि प्रात्यक्षिकसह माहिती देण्यात येणार आहे.
या बैठकित रिपाइं चे देशभरातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.