स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘ओबीई रँकिंग्ज २०२४ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान
डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स श्रेणीचे मानांकन
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ओबीई रँकिंग्ज २०२४ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे स्वेरीला डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स या श्रेणीचे मानांकन मिळाले आहे.
आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) क्षेत्रात उत्कृष्टता साध्य केल्याबद्दल हा सन्मान स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देण्यात आला आहे. सदरचे मानांकन हे आर वर्ल्ड इन्स्टिट्युशनल रँकिंग यांच्याकडून प्रदान करण्यात आले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर पॅटर्नच्या माध्यमातून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘शैक्षणिक क्रांती’ होत आहे.

गेल्या महिन्यामध्ये आर वर्ल्ड इन्स्टिट्युशनल रँकिंग यांनी ओबीई रँकिंग्ज २०२४ साठी संपूर्ण देशभरातून प्रस्ताव मागवले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ.संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीई रँकिंग्जचे समन्वयक प्रा.दिगंबर काशीद यांच्या सहकार्याने या रँकिंग मध्ये सहभाग नोंदविला होता. या प्रस्तावामध्ये महाविद्यालयात असलेल्या आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) अंतर्गत विविध उपक्रम,सोयीसुविधा, महाविद्यालया तील ओबीई करिता असणारे व्यवस्थापन आदी बाबींचा समावेश होता.
या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ zशेख यांच्यासह सर्व विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालय प्राचार्य,सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी स्वेरीच्या आय.क्यू.ए.सी.टीम चे अभिनंदन केले आहे.