सोलापूर (प्रतिनिधी) – दिनांक 4 मार्च 2020 रोजी सकाळी 11:45 वाजता सुमारे लक्ष्मी केमिकल्स समोरील चौकात घडलेल्या हाणामारीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
या प्रकरणात फिर्यादी व फिर्यादीचे भावंड चहा पित असताना, फिर्यादीच्या ओळखीचे गोपाळ गुंठे, सचिन उर्फ बॉबी शिंदे, पप्पू कोरे यांना पोलिसांची खबर देतो आहेस, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले होते. यावेळी पप्पू कोरे आणि बॉबी शिंदे यांनी लाकडी काठीने मारहाण करून फिर्यादीला जखमी केले. या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान कलम 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात अॅड. अखिल आर. शाक्य यांनी आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले की, सरकार पक्षाने कोणताही साक्षीदार प्रत्यक्ष दाखल केला नाही. तसेच आरोपीविरोधातील साक्षांमध्ये विसंगती आढळून आली. यावर आधारित युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी ओम शंकर शिवराम पाटील यांनी आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.
सदर केसमध्ये अॅड. अखिल आर. शाक्य, अॅड. अंजिता आर. शाक्य, अॅड. हर्षल शाक्य, अॅड. दर्शन चक्रवर्ती आणि अॅड. अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले.