सोलापूर: दिनांक १३/०६/२०२२ ते ११/०९/२०२२ दरम्यान फिर्यादी यांच्याकडून ३६ लाख रुपयांचा टॉवेल, बेडशीट, ब्लँकेट्स असा मुद्देमाल घेऊन आरोपी पुण्यात पसार झाले होते. वारंवार फिर्यादी हे आरोपींना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु आरोपी हे मिळून आले नाहीत. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना भेट घालणाऱ्या व्यक्तीकडे गेले असता आरोपी हे पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते व त्यांचा फोन देखील उचलत नव्हते, असे सांगितले.
त्यामुळे फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. आरोपींवर भादंवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर ६/५/२०२५ रोजी आरोपीस अटक करण्यात आली.
त्यावेळी आरोपी प्रकाश थाडाराम वासवानी यांच्यावतीने ॲड. अखिल शाक्य यांनी वकीलपत्र सादर करून जामिनासाठी अर्ज केला. आरोपींच्या वकिलांनी सादर केलेल्या युक्तिवादास प्रथम वर्ग न्यायंदंडाधिकारी कुलकर्णी मॅडम यांनी मान्यता देत २०,००० रुपयांच्या जामिनावर आरोपीस मुक्त करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. अखिल शाक्य, ॲड. हर्षल शाक्य, ॲड. अजिंक्य शाक्य, ॲड. रवींद्र अरू, ॲड. प्रविण जगताप, ॲड. दर्शना चक्रवर्ती व ॲड. अभिजीत कांबळे यांनी काम पाहिले.