सोलापूर :- समानता स्वतंत्रता बंधुता न्याय आणि लोकतंत्र या मूल्यावर आधारित जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत देशाला देणारे भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार आधुनिक भारताचे जनक क्रांतीसुर्य महामानव परमपूज्य विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्क चौक सोलापूर येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच महाबोधी महाविहार मुख्य आंदोलन स्वाक्षरी मोहीम घेण्यात आले नंबर एक मागणी बोधगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा
दुसरी मागणी बोधगया येथील महाबोधी विहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे.
या दोन्ही मागण्याच्या साठी पुतळा परिसरात स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, महासचिव अनिरुद्ध वाघमारे सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार सोलापूर शहर महासचिव विनोद इंगळे युवा नेते विक्रांत गायकवाड धाराशिव जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड विजयकुमार सुर्यवंशी, निवास संगपाल संजय हरिजन विशाल ठोंबरे रविराज पोटे दक्षिण सोलापूर अध्यक्ष सुरेश देशमुख व त्यांचे सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते.
पुतळा परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चार टेबल टाकून दोन हजार सह्या घेतल्या, शहराध्यक्ष जिल्हा महासचिव शहर महासचिव आणि त्यांच्या सर्व तालुक्यातील अध्यक्षस्थानी परिश्रम घेतले. बुध्दी जीवी नौकरदार, बौद्ध उपासक उपाशीका बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर प्रेम करणारे बहुसंख्येने नागरिक महिला पुरुष पत्रकार,शाहिर गायक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होते…..
