पार्थ पवार वाढदिवसानिमित्त पंढरपुरात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ऋतुजा पोवार, तेजस पाटील व साक्षी चव्हाण प्रथम क्रमांक

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्यावतीने राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
नेत्यांचे वाढदिवस डिजीटल बोर्ड, विविध ठिकाणी लाखो रूपये खर्च केले जातात परंतू वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील अनेक कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना आपल्या अंगातील कला गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही नक्कीच चांगली बाब आहे असे गौरवोद्गार पंढरपूरचे नेत्रतज्ञ डॉ.मनोज भायगुडे यांनी काढले.

या स्पर्धेचे उद्घाटन पंढरपुरातील नेत्रतज्ञ डॉ.मनोज भायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी समाधान काळे, साईनाथ बडवे, मुन्ना भोसले, सुनिल भोसले, लाला पानकर,कृष्णा वाघमारे,ऍड.अमित नेहतराव,अनिकेत शिरसट, संग्राम अभंगराव, युवराज मुचलंबे, विशाल आर्वे, समाधान गाजरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटातून ऋतुजा सतीश पोवार इचलकरंजी, तेजस दिनकर पाटील पुणे यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. दुसरा क्रमांक आकाश दत्तात्रय मोहिते अहिल्यानगर, रोहन जोतीराम कवडे पुणे यांना तिसरा क्रमांक तर उत्तेजनार्थ अभिजीत हनुमंत लामकाने पंढरपूर, मोनाली शेषराव पाटील पंढरपूर, प्रथम गणेश भिंगारे पानीव यांना देण्यात आला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक साक्षी शांतीनाथ चव्हाण सुस्ते, दुसरा क्रमांक निलश्री दिपक यादव सातारा, तिसरा क्रमांक राजवीर मारूती तळेकर भोसे यांना तर उत्तेजनार्थ सृष्टी राजेंद्र माने निमगांव, श्रृती देठे वाडीकुरोली,आरोही गणेश मारेकर बागल वस्ती यांना देण्यात आला.

या स्पर्धेत सांगली,सातारा,कोल्हापूर,कराड, छत्रपती संभाजीनगर,अहिल्यानगर,पैठण, सोलापूर,पंढरपूर,बीड, परभणी या भागातील 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे परिक्षक म्हणून दादासाहेब तळेकर, योगेश गायकवाड, प्रा.परमेश्वर झांबरे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभम पवार, सारंग महामुनी, प्रदिप निर्मळ, रफिक मुलाणी, अभिनव शिंदे यांनी प्रयत्न केले.
पुढील वर्षी 1 लाख रूपयांचे बक्षीस देणार – श्रीकांत शिंदे
पुढील वर्षी वक्तृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यात प्रथम क्रमांकासाठी स्पर्धा निर्माण झाली पाहिजे यासाठी 1 लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले.