महायुती सरकार विकास कामावर लक्ष देण्याऐवजी बिनकामाचे मुद्दे उकरून काढून जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यावरून भटकवण्याचे काम करत आहेत : खा. प्रणिती शिंदे

कुणाल कामरा सारखी भाषा निवडणुकीत अनेक नेत्यांनी वापरली होती

महायुती सरकार विकासकामावर लक्ष देण्याऐवजी बिनकामाचे मुद्दे उकरून काढून जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यावरून भटकवण्याचे काम करत आहेत : खा.प्रणिती शिंदे

नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 मार्च 2025- नवी दिल्ली संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य आहे.पण सध्या महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याने सेट आणि कार्यालयाचे तोडफोड, खून, बलात्कार, विनयभंग आदी प्रकार सुरू आहेत. त्यांच्याकडे दुसरे कुठले काम उरले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगार युवकांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न यासारखे अनेक प्रश्न उभे आहेत.

महाराष्ट्र शासन आर्थिक अडचणीत असल्यामुळे कुठलीही विकासकामे होताना दिसून येत नाहीत.म्हणून लोकांच्या मूळ प्रश्नावरून लक्ष वळविण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरण आणि बिनकामाचे प्रश्न उकरून काढत आहेत.देशात व्यक्तिस्वातंत्र्य असताना कुणाल कामरा विनोदी कलाकार असून त्यांनी करमणूक म्हणून एक विनोद केला त्यामुळे त्याचे सेटची तोडफोड करण्यात आली.

हे लोक संविधान आणि लोकशाहीला मानत नाहीत. आजपर्यंत महाराष्ट्रात असे घडले नाही. त्यांच्यासारखी भाषा निवडणुकीत अनेक नेत्यांनी आजपर्यंत वापरली आहे.त्यांनी यापेक्षा वेगळे काही बोललेले नाहीत.या तोडफोडी सारख्या घटना महाराष्ट्रावर दूरगामी परिणाम करणार्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top