द.ह.कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी पहिला छावा

द.ह.कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी पहिला छावा

स्वराज्यरक्षक धर्मरक्षक छत्रपती श्री संभाजीराजे यांच्या झंजावाती व कर्तृत्वसंपन्न कारकिर्दीची साक्ष देणारा छावा चित्रपट

प्रशालेतील विद्यार्थिनींनी अत्यंत जोश पूर्ण आवाजात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या कार्याचा जय जयकार केला

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०३/२०२५ – द.ह.कवठेकर प्रशालेच्या 200 विद्यार्थिनींनी आज स्वराज्यरक्षक धर्मरक्षक छत्रपती श्री संभाजीराजे यांच्या झंजावाती व कर्तृत्वसंपन्न कारकिर्दीची साक्ष देणारा छावा चित्रपट पाहिला.अत्यंत जोशपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी द.ह.कवठेकर प्रशाला ते डीव्हीपी मॉल थिएटर पर्यंत रॅली काढली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या घोषणा देत चित्रपटगृहात प्रवेश केला.

छत्रपती संभाजी राजे यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारा व स्वराज्य आणि हिंदूधर्म यांचे रक्षण करताना त्यांनी भोगलेल्या मरण यातना पाहून अख्खे थेटर साश्रू नयनांनी गाहिवरले. यावेळी विद्यार्थ्यांनी गनिमी कावा युद्धनीती,प्रत्यक्ष समोरा समोरील लढाई, शिवकालीन हेर खाते,दुर्गम भू भाग याची माहिती घेतली.आपल्या जाणत्या राजाला झालेल्या स्वराज्य रक्षणासाठीच्या यातना पाहण्याचे धैर्य मराठी माणसात नाही याची प्रचिती आली.

चित्रपट संपताच प्रशालेतील विद्यार्थिनींनी अत्यंत जोश पूर्ण आवाजात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या कार्याचा जय जयकार केला.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी,ज्येष्ठ पर्यवेक्षक आर.एस.कुलकर्णी,क्रीडाशिक्षक प्रशांत मोरे, कलाशिक्षक अमित वाडेकर ,व्ही.पी.पवार सर ,सौ.मोरे मॅडम,सौ.इरकल मॅडम, सौ.फडके मॅडम,कु.स्वाती शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना चित्रपट पाहण्याचे उत्तम नियोजन केले होते.डीव्हीपी मॉल थिएटरच्या व्यवस्थापनानेही चांगले सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top