शेळवे येथे पारंपारिक पद्धतीने होळी साजरी
परंपरेनुसार शेळवे येथे होळी सण बारा बलुतेदारांसह ग्रामस्थांनी मिळून केला साजरा
शेळवे गावातील सर्व लहान मोठ्या मुलांनी राड खेळुन आनंद केला साजरा
शेळवे/संभाजी वाघुले/ज्ञानप्रवाह न्यूज- आपल्या समाजात सर्व काही परंपरेनुसारच सण उत्सव साजरे होत आलेले आहेत.त्या परंपरेनुसारच शेळवे ता.पंढरपूर येथे होळी हा सण बारा बलुतेदारांसह ग्रामस्थांनी मिळून साजरा केला.

परंपरेनुसार होळी ही गावातील काही घटकातील जाणकरांनी मांडायची असते. शेळवे येथे परंपरेनुसार होळी मांडायला शेळवे गावातील बारा बलुतेदारांपैकी बापु लोखंडे,गहिनीनाथ लोखंडे,पवन लोखंडे , श्रवण रेडे,संचित भोसले,अनिकेत गाजरे, तनय गाजरे,सूरज गुरव,हर्षद कौलगे यांनी गोवर्या, लाकडे,ऊस ,एरंडाचा फाटा अशी सर्व मांडणी करुन होळी हा सण शेळवे ग्रामस्थांसह लहान मुलांनी साजरा केला.
यावेळी सर्व लहान मुलांनी होळी ला अग्नी देऊन बोंब मारत पाच फेर्या मारल्या व आनंदाने आपापल्या घरची होळी पेटवण्यासाठी सर्व मुले गेली.

शेळवे गावातील सर्व लहान मोठ्या मुलांनी राड खेळुन आनंद साजरा केला.होळीची राञभर पैटुन पडलेली राख व पाणी मिसळुन व त्याचे मिश्रण संक्रातीच्या गाडग्यात भरुन एकमेकाला लावतात.गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन मुलांना राड खेळण्यास घेऊन येणे व शेवटी नदीला जाऊन मनसोक्त आंघोळ करणे म्हणजेच राड खेळणे हा ग्रामीण भागातील होळी चा आनंद असतो.