मुंबई येथे मंत्रालयात उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- मंत्रालयात जलसंपदा,गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली.

या बैठकीत पुढील मुद्दांवर चर्चा झाली :
तात्काळ उजवा व डावा कालवा पाणी सोडण्याचे ठरवले, बोगद्यातून सीना नदीस व सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी सोडण्याचे ठरवले,भीमा व सीना नदीवरील नादुरूस्त बंधाऱ्याचे बर्गे (दरवाजे) बदलून देण्यासाठी मंत्री महोदयांकडं एकूण ३११४ बंधाऱ्याचे दरवाजांची कमतरता असून १५६९ दरवाजे मंजूर करून घेतले असून पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित दरवाजेही मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले.पंढरपूर शहराच्या पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

या बैठकीला ग्रामविकासमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे,आमदार सर्वश्री दिलीप सोपल,सुभाष देशमुख, नारायण पाटील,उत्तमराव जानकर, सचिन कल्याणशेट्टी,राजू खरे,समाधान आवताडे, डॉ.बाबासाहेब देशमुख, देवेंद्र कोठे हे लोकप्रतिनीधी उपस्थित होते.

यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले,जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ,सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे,अतिरिक्त जिल्हाधिकारी सौ.मोनिका सिंग उपस्थित होते.