दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्या प्रकरणी मंगळवेढा शहरात दोघांविरूध्द गुन्हा दाखल

दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्याप्रकरणी दोघांविरूध्द मंगळवेढा शहरात गुन्हा दाखल

जिल्हा वाहतुक शाखेच्या पोलिसांची कारवाई

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा शहरात दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्याप्रकरणी दत्तात्रय बबन ढोणे वय 38 रा.गुंजेगाव,सुनिल मल्लिकार्जून गोपाळकर वय 26,रा.कुंभार गल्ली या दोघांविरूध्द मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दारूचे सेवन करून वाहने चालविणार्‍यांविरूध्द कडक कारवाईची मोहिम जिल्ह्यात सुरु केली असून जिल्हा वाहतूक शाखा ग्रामीणचे पोलिस उपनिरिक्षक राजेश रणदिवे,पोलिस हवालदार रामचंद्र पोतदार,पोलिस अंमलदार श्रीकांत दुधाळ, स्वप्नील कोळी,दिपक गाडवे आदींचे पथक सोलापूर-मंगळवेढा या राष्ट्रीय मार्गावर कारवाईसाठी मंगळवेढा शहरात दामाजी चौक येथे कारवाई करत असताना पोलिस ठाण्याजवळ यातील आरोपी सुनिल गोपाळकर हा हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल एम एच 13 ए.क्यू 5149 ही गाडी वेडीवाकडी चालवित असताना सदर पथकास मिळून आला.त्याची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशिनने टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.याची फिर्याद पोलिस अंमलदार दिपक गाडवे यांनी दिली.

दुसर्‍या घटनेत आरोपी दत्तात्रय बबन ढोणे वय 38,रा.गुंजेगाव हा हिरो कंपनीची एम एच 45 बी 0934 ही मोटरसायकल दारूचे सेवन करून बसस्थानकाजवळ वेडीवाकडी गाडी चालवित असताना पोलिसांना मिळून आला असल्याचे पोलिस अंमलदार श्रीकांत दुधाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दारूचे सेवन करून वाहन चालविल्यास जिल्हा वाहतुक शाखेच्या पोलिसांची आपल्यावर करडी नजर राहणार आहे.अशी कारवाई सातत्याने आणि प्रामाणिकपणे करण्यात आली तर वाहन अपघातांची संख्या निश्चितपणे घटणार असून निष्पापांचे जिव वाचण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top