शिबिरामध्ये बेटी बचाव बेटी पढाव आणि POCSO पाॅक्सो बद्दल कायदेशीर मार्गदर्शन
अधिवक्ता संघ पंढरपूर व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर संपन्न

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०३/२०२५ – अधिवक्ता संघ पंढरपूर व तालुका विधी सेवा समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर दि.०४/०३/२२५ रोजी दुपारी २.०० वाजता कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला पंढरपूर येथे पार पडले.
या शिबिरामध्ये बेटी बचाव बेटी पढाव आणि POCSO (Protection of Children from Sexual Offence Act 2012 पाॅक्सो बद्दल कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम यांनी केले.अध्यक्ष राजेश चौगुले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना त्यांनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्याचे तसेच स्पेस टेक्नॉलॉजी शिक्षण घेऊन अंतराळवीर होण्याचे आवाहन केले.
सचिव अभयसिंह देशमुख यांनी महिलांचे कायदेशीर हक्क व अधिकार बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
सदस्य गणेश चव्हाण यांनी International Human Right Day बद्दल माहिती.
ॲड.अर्चना कुलकर्णी यांनी भारतीय राज्यघटनेमधील विद्यार्थिनींचे शिक्षणाचे हक्क आणि अधिकार याबद्दल मार्गदर्शन केले.
अँड वर्षा हिरणवाले यांनी बेटी बचाव बेटी पढाव याबद्दल मार्गदर्शन केले.
दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती पाखले मॅडम यांनी विद्यार्थिनींना कायदा, हक्क अधिकार तसेच कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तरी त्याला वाचा फोडून अन्याय दूर करण्यासाठी कोठे दाद मागायची त्याबाबत कायद्यातील तरतुदी तसेच POSCO पॉक्सो कायद्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष ॲड महेश कसबे यांनी केले.या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे तसेच माजी मुख्याध्यापक सुनील यारगट्टीकर आदी उपस्थित होते.