LIVE: अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनबाबत अपडेट,बुलेट ट्रेनची चाचणी 2026 मध्ये सुरू होणार


Maharashtra Marathi Breaking News Live Today :अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणारी देशातील पहिली बुलेट ट्रेन. या ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, 360 किलोमीटरचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी न दिल्यामुळे ते पूर्ण होण्यास अडीच वर्षांचा विलंब झाला. बुलेट ट्रेनची चाचणी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणारी देशातील पहिली बुलेट ट्रेन. या ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, 360 किलोमीटरचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी न दिल्यामुळे ते पूर्ण होण्यास अडीच वर्षांचा विलंब झाला. बुलेट ट्रेनची चाचणी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.सविस्तर वाचा …

 

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापुरे) येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. या गावात 6,831 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. या संदर्भात प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे आणि नागरिकांना आवश्यक माहिती दिली आहे. मृत कोंबड्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आणि संसर्गाची पुष्टी झाली.सविस्तर वाचा …

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top