RCB vs DC: दिल्लीचा नऊ विकेट्सनी विजय, आरसीबीचा घरच्या मैदानावर सलग चौथा पराभव



RCB vs DC: शेफाली वर्मा आणि जेस जोनासन यांच्यातील 146* धावांच्या भागीदारीच्या जोरावर, दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला नऊ विकेट्सने पराभूत केले. शनिवारी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीगच्या14 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने गतविजेत्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. एलिस पेरीच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने 20 षटकांत पाच बाद 147धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीने 15.3 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 151 धावा केल्या आणि 27 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

ALSO READ: दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनला

आरसीबीचा त्यांच्या घरच्या मैदानावर हा सलग चौथा पराभव आहे.यापूर्वी, त्यांना मुंबई इंडियन्स (चार विकेट्सने पराभूत), यूपी वॉरियर्स (सुपर ओव्हरमध्ये पराभूत) आणि गुजरात जायंट्स (सहा विकेट्स) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. या विजयासह, मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 10 गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट 0.482 आहे. दरम्यान, आरसीबीने चार गुणांसह आणि -0.244 च्या नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

ALSO READ: AFG vs ENG: इंग्लंड स्पर्धेतून बाहेर, अफगाणिस्तानचा पहिला विजय

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अ‍ॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (यष्टीरक्षक), निक्की प्रसाद, शिखा पांडे, मिन्नू मणी, नल्लापुरेड्डी चरणी.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), डॅनी वायट-हॉज, एलिस पेरी, राघवी बिस्ट, कनिका आहुजा, रिचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, स्नेहा राणा, रेणुका सिंग ठाकूर, एकता बिश्त.

Edited By – Priya Dixit 

 

ALSO READ: IPL 2025: दिल्ली कॅपिटल्स संघाचा मोठा निर्णय, या अनुभवी खेळाडूकडे सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top