प्रहार संघटना जनशक्ती पक्षाच्या शहर अध्यक्षपदी संदिप परचंडे तर पंढरपूर युवा तालुकाध्यक्षपदी गणेश कांबळे यांची निवड
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर विश्रामगृह येथे प्रहारचे संस्थापक तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष मा.आ. बच्चु कडू व जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के यांच्या उपस्थितीत पंढरपूर शहर व तालुका पदाधिकारी यांच्या निवडी पार पडल्या.

यावेळी प्रहार संघटनेची ओळख गोरगरीबांचे व दिन दुबळ्यांचे दैवत पांडूरंगाच्या नगरीतून करण्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन केल्याची माहिती यावेळी प्रहारचे संस्थापक तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष मा.आ.बच्चु कडू यांनी दिली.

पंढरपूर नगरीत व तालुक्यात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी गाव तिथं शाखा, गाव तिथं प्रहार हा उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
