लीलावती रुग्णालयाचे परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि प्रस्तावित कॅन्सर केअर हॉस्पिटल मेयो क्लिनिक यांच्यात लेटर ऑफ इंटेन्टवर स्वाक्षरी
लीलावती इनिशिएटिव्ह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहून रुग्णालय,डॉक्टर्स,परिचारिका व कर्मचारी वर्गास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज – मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयाचे परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि प्रस्तावित कॅन्सर केअर हॉस्पिटल मेयो क्लिनिक यांच्यातील लेटर ऑफ इंटेन्टवर स्वाक्षरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या लीलावती इनिशिएटिव्ह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहून रुग्णालय, डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी वर्गास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास शुभेच्छा दिल्या.

१९७८ साली १० बेडस आणि २० डॉक्टरांना सोबत घेऊन लीलावती रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. आज २८ वर्षांनी लीलावती रुग्णालय हे मुंबईतील आरोग्य क्षेत्रातील अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव बनले आहे. ज्या पद्धतीची दर्जेदार रुग्णसेवा आणि आधुनिक उपचारपद्धती इथे मिळते ती इतरत्र कुठेही मिळत नसल्याने दिवसागणिक या रुग्णालयाचा नावलौकिक वाढत आहे असे मत याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही आपल्या अखेरच्या दिवसात याच रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यांच्यापासून ते नुकताच इथून डिस्चार्ज घेऊन गेलेल्या बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पर्यंत सगळ्यांना ठणठणीत बरे करून घरी पाठवणे हे या रुग्णालयाचे वैशिष्ट्य ठरले आहे. तोच लौकिक आगामी काळातही ते कायम राखतील असा विश्वास यासमयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

आज अमेरिकेतील मेयो क्लिनिक सोबत दर्जेदार नर्सिंग प्रशिक्षण आणि प्रस्तावित कॅन्सर केअरसाठी जे लेटर ऑफ इंटेन्टवर स्वाक्षरी केली गेली आहे. या रुग्णालयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून याद्वारे आगामी काळात ते अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा देऊ शकतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,मेयो क्लिनिक यूएसएचे सीईओ बिजू सॅम कुट्टी तसेच लीलावती रुग्णालयाच्या संचालक श्रीमती चारू किशोर मेहता व रुग्णालयातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

EknathShinde,Mumbai,Maharashtra, LilavatiHospital,Shivsena, शिवसेना, Lilavati Hospital,Mumbai ,Prakash Abitkar, Adv. Ashish Shelar,ॲड. आशिष शेलार, Pratap Sarnaik ,Dr Shrikant Eknath Shinde,