प्रीती करमरकर यांचे अचानक जाणे अत्यंत दुःखद – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्री चळवळीतल्या अग्रणी कार्यकर्त्या प्रीती करमरकर यांचे निधन

प्रीती करमरकर यांचे अचानक जाणे अत्यंत दुःखद- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०१/२०२५ –कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयामध्ये सक्रिय असलेल्या नारी समता मंच संस्थेच्या मुख्य कार्यकारी समिती सदस्य प्रीती करमरकर यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले.करमरकर यांनी सामाजिक क्षेत्रातील कार्य व्यतिरिक्त पुणे रेल्वे,पुणे मेट्रो, एआयएसईआर तसेच राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) या प्रकल्पामध्येही काम केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘ब्रिजिंग सेंटर्सं’ ची स्थापना केली. स्त्री आधार केंद्राच्या विविध उपक्रमात तसेच कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

प्रीती करमरकर यांचे अचानक जाणे अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीच भरून निघणार नाही.त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळू देत,अशी भावना व्यक्त करत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत करमरकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयांमध्ये पदवी आणि पदवीत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात असलेल्या एका सामुदायिक आरोग्य प्रकल्पाचा त्या भाग बनल्या.या कामाच्या ओघातच पुढे त्या नारी समता मंच संस्थेशी जोडल्या गेल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top