पंढरपूर श्रमिकच्या अध्यक्ष पदी अभिराज उबाळे तर कार्याध्यक्षपदी संतोष कुलकर्णी

पंढरपूर श्रमिकच्या अध्यक्षपदी अभिराज उबाळे तर कार्याध्यक्षपदी संतोष कुलकर्णी

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लोकशाही वृत्तवाहिनी प्रतिनिधी अभिराज उबाळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्ताने पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाची बैठक पार पडली यावेळी अभिराज उबाळे यांच्या सह विविध निवडी करण्यात आल्या. यामध्ये कार्याध्यक्षपदी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी, सचिवपदी आरएनओ चे प्रतिनिधी दत्तात्रय देशमुख, उपाध्यक्षपदी दैनिक ऐक्यचे श्याम दिवेकर, खजिनदारपदी दैनिक सकाळचे भारत नागणे यांची निवड देखील करण्यात आली.

यावेळी मावळते अध्यक्ष संतोष रणदिवे, जेष्ठ पत्रकार महेश खिस्ते,सुनील दिवाण,प्रशांत आराध्ये,अतुल बडवे,अभय जोशी,महेश भंडारकवठेकर,सत्यविजय मोहोळकर,मंदार लोहोकरे यांच्यासह सचिन कसबे, विनायक हरिदास, संकेत कुलकर्णी, सुरज सरवदे, नितीन शिंदे, राजू मिसाळ, नागनाथ सुतार, दत्तात्रय खटवटे, राजकुमार घाडगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top