पालखी प्रस्थानाने खर्डी भंडाऱ्याची सांगता
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील श्री सीताराम महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता अमावस्येला झाली.यात्रेवेळी जवळपास दोन लाख भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले.

कोल्हापूर सांगली कर्नाटक तसेच सोलापूर जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थिती लावली होती.बाहेर गावाहून आलेल्या पै पाहुणे,लेकी जावई,मुलांबाळांसह गाव फुलून गेला होता.
खेळणी, घरगूती वापरांच्या वस्तूंची मोठी उलाढाल झाली. दुपारी 12:30 वा समाधी वर पुष्पवर्षाव करण्यात आला. पंचकट्यावर शिधा जमा करण्यात आला.

यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पांडुरंग परिवाराचे प्रमुख प्रशांत परिचारक, पंढरपूर मंगळवेढा मतदार आमदार समाधान आवताडे,शहर विकास आघाडीचे प्रमुख उमेश परिचारक,युवा नेते प्रणव परिचारक, शिवाजी रोंगे ,सरपंच मनीषा सव्वाशे, उपसरपंच शरद रोंगे आदींसह अनेक राजकीय व्यक्तींनी दर्शन घेतले.श्रींची पालखी गावातून शोभेच्या दारूकामाने नगरप्रदक्षिणा करून गाणगापूरसाठी प्रस्थान ठेवण्यात आले.

यावेळी मुख्य विस्वस्त हरिभाऊ कुलकर्णी, अध्यक्ष दीपक रोंगे,बापू केसकर, पालखी सोहळा प्रमुख विकास कुलकर्णी लक्ष्मण रोंगे,अशोक पाटील,दत्ता पाटील,दत्ता यादव, अभिजित रोंगे,हणमंत केसकर,चैतन्य केसकर,बाळू मोकाशी,किरण मोकाशी, उपस्थित होते.सांगोला पंढरपूर येथून विशेष यात्रा बसची सोय करण्यात आली होती. समस्त ग्रामस्थांच्या वतीने यात्रा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.पालखी मंगळवेढा,अक्कलकोट मार्गे गाणगापूर जाणार आहे.
