द.ह.कवठेकर प्रशालेचे उपमुख्याध्यापक एन.बी.बडवे सर यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर एज्युकेशन सोसायटीमध्ये गेली तीस वर्षे कार्यरत असणारे द.ह.कवठेकर प्रशालेचे उपमुख्याध्यापक एन.बी.बडवे सर यांचा सपत्नीक सत्कार समारंभ प्रशालेत संपन्न झाला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नाना कवठेकर , मान्यवर पदाधिकारी एस.पी.कुलकर्णी, डॉ.मिलिंद जोशी, संजय कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय तरळगट्टी, श्रीमती बारसावडे मॅडम , संजय रत्नपारखी तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. एन.बी.बडवे सर यांनी संस्थेमध्ये सुमारे 30 वर्षे केलेल्या कार्याचा गुणगौरव व त्यांचे ऋण व्यक्त केले.संस्थेचे पदाधिकारी एस.पी. कुलकर्णी सर यांनी एन.बी.बडवे सर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.
सत्कारमूर्ती एन.बी.बडवे सर यांनी सर्व सहकाऱ्यांचे व संस्थेचे ऋण व्यक्त केले. याप्रसंगी राजेश धोकटे,राजेश खिस्ते,नितीन अवताडे,शामराव उत्पात ,श्रीरंग उत्पात, श्रीमती बारसावडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास बडवे परिवारातील सदस्य, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.मान्यवरांचे आभार ज्येष्ठ शिक्षक आर.एस.कुलकर्णी यांनी मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एम. कुलकर्णी यांनी केले.
