सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी विधान सभा निवडणुकीचा अहवाल मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केला सादर
मतपात्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी भारत जोडो सारखी लोकशाही वाचवा सह्यांची मोहीम सुरू करणार – नाना पटोले
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,२८ नोव्हेंबर २०२४- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील उमेदवार,शहर व जिल्हाध्यक्ष यांची बैठक टिळक भवन दादर येथे आयोजित केली होती.

यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी विधानसभा निवडणुकीचा अहवाल मुंबई येथील बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंकडे सादर केला.
या बैठकीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,नसीम खान,भाई जगताप यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, निवडणूक प्रचारात काँग्रेस महाविकास आघाडीला मोठ्ठा प्रतिसाद होता. महाविकास आघाडी सत्तेवर येणार असे दिसत होते.पण महायुतीने बेईमानाने सत्ता घेतली.महायुतीला एवढे बहुमत कसे मिळाले याबाबत जनता सुद्धा संभ्रमित आहे. लोकांच्या मतदानाने नाहीत तर मशीन ने सत्ता काबीज केली आहे अशी शंका अनेकांनी व्यक्त केले.अनेक उमेदवारांनी EVM वर शंका उपस्थित केली आहे.आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यासाठी भारत जोडो सारखी लोकशाही वाचवा सह्यांची मोहीम सुरू करणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले थोड्याच दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागणार आहेत न खचता त्यासाठी कामाला लागा.संघटना बळकट करून रस्त्यावरच्या लढाईसाठी सिद्ध व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी सोलापुरातून चेतन नरोटे, तिरूपती परकीपंडला यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे उमेदवार,शहराध्यक्ष आदी उपस्थित होते.
