केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली कोमपल्ली प्रभूदास कुटुंबियांची सांत्वनपर भेट
दिवंगत सागर कोमपल्ली यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२२/११/२०२४- रिपब्लिकन पक्षाचे तेलंगणाचे ज्येष्ठ नेते कोमपल्ली प्रभुदास यांना पुत्रशोक झाल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज त्यांची सांत्वन पर भेट घेतली. तेलंगणातील सिद्धीपेठ जिल्ह्यातील जक्कापूर या गावातील कोमपल्ली प्रभुदास यांच्या निवासस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन शोकाकुल प्रभुदास कुटुंबीयांचे सांत्वन केले. कोमपल्ली प्रभुदास यांचे सुपुत्र कुमार सागर याचे वयाच्या 23 व्या वर्षी अपघाती दुःखद निधन झाले. त्यामुळे संपूर्ण जक्कापुर गावात शोककळा पसरली होती.

कोमपल्ली प्रभुदास यांनी रिपब्लिकन चळवळीसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. तेलंगानातील रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढवण्यास त्यांचे मोठे योगदान आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून कोमपल्ली प्रभुदास यांची निवड झालेली आहे. तेलंगणमध्ये रिपब्लिकन चळवळ वाढवण्यात प्रभुदास यांचा मोलाचा वाटा आहे.स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून रिपब्लिकन संघटने कडे अधिक लक्ष दिले असल्याने त्यांना झालेल्या पुत्रशोकामुळे रिपब्लिकन पक्षात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे आंध्र प्रदेश अध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी, तेलंगणाचे निरीक्षक ज्येष्ठ नेते परम शिवा नागेश्वर गौड; रिपाइं चे तेलंगणा राज्याध्यक्ष रविकुमार पसूला आणि रिपब्लिकन पक्षाचे ख्रिश्चन नेते जॉन मॉस्को; रत्नप्रसाद,महिला नेत्या स्नेहलता,रोजारानी आदिंसह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी दिवंगत सागर कोमपल्ली यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जाहीर शोकसभा घेण्यात आली.त्यात ना. रामदास आठवले यांनी दिवंगत सागर कोमपल्ली यांना रिपब्लिकन पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.यावेळी जक्कपुर गावातील सरपंच,पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आदी उपस्थित होते.
