मंदिर समितीला कार्तिकी यात्रेत 3 कोटी 57 लाखाचे उत्पन्न- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मंदिर समितीला कार्तिकी यात्रेत 3 कोटी 57 लाखाचे उत्पन्न कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ता.17- माघी, चैत्री,आषाढी व कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रा पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भरत असतात. कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा 12 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या यात्रा कालावधीत मंदिर समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून 3 कोटी 57 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्रींच्या चरणाजवळ रू.4141314/- (रू.4015667/-), भक्तनिवास रू.4448581/- (रू.6662377/-), देणगी रू.11460362/- (रू.12892371/-), लाडूप्रसाद रू.6064620/- (रू.6249000/-), पूजा रू.1072681/- (रू.407000/-) सोने चांदी भेट रू.504015/- (रू.836254/-), दानपेटी रु.7356104/- (रु.15721527/-) व इतर रू.699645/- (रू.924072/-) असे एकूण रू.35747322/- (रू.47708268/-) असा उत्पन्नाचा तपशिल आहे. कंसात मागील वर्षाची आकडेवारी आहे.

यामध्ये प्रामुख्याने सुमारे 6 लाख बुंदी लाडू प्रसादाची विक्री झाली आहे. तसेच देणगी व इतर रकमा जमा करून घेण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करण्यात येत असल्याने, या यात्रेत 21 लाख 69 हजार इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा झाली आहे. इतर जमेमध्ये भक्तनिवास, गोमूत्र, शेणखत, मोबाईल लॉकर, महा वस्त्र, चंदन पावडर, जमीन खंड व अनुषंगिक बाबींचा समावेश आहे.

मागील वर्षीपेक्षा 1 कोटी 19 लाख इतकी उत्पन्नात घट झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.या मिळालेल्या दानातून भाविकांना अत्याधुनिक व अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top