श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास रवींद्र भांबरे या भाविकां कडून 1 लाख रूपयाची देणगी
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज, ता.17- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास रवींद्र भांबरे सटाणा जि.नाशिक येथील भाविकानी 1 लाख 111 रूपयांची देणगी दिल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

दिनांक 17 नोव्हेंबर रोजी देणगीदार श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरला आले असता त्यांनी मंदिरे समितीस दान दिले असून देणगीदार श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत.
या दानशुर देणगीदाराचा मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीच्या सहाय्यक विभाग प्रमुख मनीषा जायकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कर्मचारी अनंता रोपळकर उपस्थित होते.
