रोनाल्डोने केले दोन गोल, पोर्तुगालने पोलंडचा 5-1 असा पराभव केला


cristiano-ronaldo
स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलच्या जोरावर पोर्तुगालने शुक्रवारी पोलंडचा 5-1 असा पराभव करून नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पोर्टो येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात रोनाल्डोने चमकदार कामगिरी केली आणि त्याला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

त्याने पेनल्टी किकवर (72 व्या मिनिटाला) त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 134 वा गोल केला आणि नंतर काही वेळाने (87 व्या मिनिटाला) ओव्हरहेड पासवर सायकल किक मारून पोर्तुगालसाठी त्याच्या एकूण गोलांची संख्या 135 वर नेली. त्यानंतर रोनाल्डोने आपल्या नेहमीच्या शैलीत सेलिब्रेशन केले. रोनाल्डोशिवाय राफा लियाओ, ब्रुनो फर्नांडिस आणि पेड्रो नेटो यांनी गोल केले. पोलंडने 88व्या मिनिटाला एकमेव गोल केला. या पराभवासह पोलंडच्या उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. 

 

रोमानिया आणि कोसोवो यांच्यातील UEFA नेशन्स लीग सामना रद्द करण्यात आला आहे,” फुटबॉल संस्थेने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. UEFA योग्य वेळी पुढील माहिती देईल. ए 4 गटात आधीच पहिले स्थान मिळविलेल्या स्पेनने कोपनहेगनमध्ये डेन्मार्कचा 2-1 असा पराभव केला. फ्रान्स, इटली, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल यांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

Edited By – Priya Dixit

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top