मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करणाऱ्या संतोष कटके,साधू कटके यांच्यावर कारवाईची रिपाइंची मागणी
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने साकीनाका पोलीस स्टेशन येथे तीव्र निदर्शने

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/११/२०२४- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करणाऱ्या संतोष कटके आणि साधू कटके यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने साकीनाका पोलीस स्टेशन येथे तीव्र निदर्शने करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे,मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे,एम एस नंदा,विवेक पवार, दादासाहेब भोसले, बाबुशा कांबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.